Ad will apear here
Next
ऑकलँडमध्‍ये दिवाळीनिमित्त विविध कार्यक्रम
न्युझीलंड : ऑकलँड दिवाळी फेस्टिवल हा शहराच्‍या सर्वांत उत्‍साहपूर्ण सांस्‍कृतिक सणांपैकी एक आहे. या वर्षी १९ ते २१ ऑक्‍टोबर २०१८ या कालावधीत दरम्‍यान दिवाळीवर आधारित अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१९ ऑक्‍टोबर रोजी स्‍थानिक लोकांना, तसेच पर्यटकांना फ्रेबर्ग प्‍लेमध्‍ये रांगोळी स्‍पर्धा ‘चॉक इट अप’ आणि एलेन मेल्विले सेंटरमध्‍ये दिवाळीवर आधारित कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे. पर्यटकांना मेंदीचा, इंटरअॅक्टिव्‍ह डिजिटल हिंदी भाषिक गेम्‍स, तसेच गोड मिठाईंपासून चमचमीत, नमकीन अशा विविध प्रकारच्‍या भारतीय पदार्थांचा आस्‍वाद घ्‍यायला मिळणार आहे.

दिवाळीचा मुख्य सण २० ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहे. एओटा स्‍क्‍वेअर स्‍टेज, क्‍वीन सेंट स्‍टेज आणि कॉर्नर ऑफ क्‍वीन अॅंड वेकफिल्‍ड या शहराच्या तीन मुख्‍य भागांत आयोजित केल्या जाणाऱ्या या सणात बॉलिवूड ते पंजाबी, गुजराती ते भरतनाट्यम, राजस्‍थानी ते हिंदुस्‍तानी अशा सादरीकरणांचे मिश्रण असणार आहे.

सणापूर्वी व सणादरम्‍यान वेक्‍टर लाइट्स रांगोळीच्‍या पारंपरिक कलाप्रकारातून प्रेरणा घेत १८ ते २१ ऑक्‍टोबरपर्यंत ऑकलँड हार्बर ब्रिज येथे लाइट शो सादर केला जाणार आहे. न्युझीलंड आधारित ऊर्जा कंपनी वेक्‍टर आणि ऑकलँड कौन्सिल यांच्‍यामधील स्‍मार्ट एनर्जी सहयोगाचा हा एक भाग आहे.

याविषयी सांगताना फेस्टिवलच्‍या निर्मात्या लीलाना मेरेडिथ म्‍हणाल्या, ‘वेक्‍टर लाइट्स ऑकलँड हार्बर ब्रिजवरील लाइट शोसह २०१८च्‍या फेस्टिवलमध्‍ये नवीन पैलूची भर करत असल्‍याचे पाहून खूप आनंद होत आहे. या लाइट शोमध्‍ये रांगोळीच्‍या आकर्षक रंगसंगती व डिझाइन्‍स सादर केल्‍या जाणार आहेत.’

ऑकलँड दिवाळी फेस्टिवल हा न्युझीलंडमधील सर्वांत लोकप्रिय सांस्‍कृतिक फेस्टिवल्‍सपैकी एक आहे. या फेस्टिवलला गेल्‍या वर्षी ५५ हजार लोक उपस्थित होते. या फेस्टिवलदरम्यान भारतातील कलहरी आर्ट अॅंड कल्‍चर अॅकॅडमी भांगडा, गिधा, जिंदावा, मालवाई आणि झूमर अशा विविध स्‍टाइल्‍समध्‍ये मनोरंजन सादर करेल.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZOQBT
Similar Posts
‘स्टार्स’च्या आठवणीतली दिवाळी ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर सध्या सुरू असलेल्या लोकप्रिय मालिकांमधील कलाकारांनी दिवाळीच्या निमित्ताने प्रेक्षकांना शुभेच्छा देत काही खास आठवणींचे गाठोडे उघडले आहे. काहींनी बालपणीच्या दिवाळीची सांगतानाच आता तशी दिवाळी साजरी करता येत नसल्याची खंत व्यक्त केली.
‘सणासुदीत पारंपरिक कपडे आवडतात’ मुंबई : ‘धनत्रयोदशीपासून ते भाऊबिजेपर्यंत दिवाळीचा संपूर्ण आठवडा कुटुंबीय व मित्रमंडळींबरोबर साजरा करण्याच्या कितीतरी सुंदर आठवणी मी जपून ठेवल्या आहेत आणि उत्सवाच्या या संपूर्ण आठवड्यामध्ये पारंपरिक कपडे घालून सजणे मला खूप आवडते,’ असे भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली याने सांगितले.
सफाई कामगारांना दिवाळी निमित्ताने भेट पुणे : नागरिकांचे आणि पर्यायाने शहराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सातत्याने झटणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना पुण्यातील महर्षी व्यास प्रतिष्ठानतर्फे दिवाळीनिमित्ताने भेटवस्तू देण्यात आल्या. कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सफाई कामगारांना या भेटवस्तूंचे वाटप खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले
सिंगापूरमध्येही दिवाळीची धामधूम सिंगापूर : केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात दीपावलीची,दिव्यांच्या सणाची तयारी सुरू आहे. सिंगापूरही दिवाळीसाठी सजले असून रोषणाईने लखलखत आहे. बहुसांस्कृतिक समाज या नात्याने सिंगापूरचे नागरिक कायमच त्यांच्या सणांबद्दल उत्साही असतात. त्यामुळे दिवाळीही येथे मोठ्या जोशात व उत्साहात साजरी केली जाते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language